कळमनुरी शहरासह तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचे प्रकार घडले. दाती गावात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल पडल्याची घटना समोर आली असून त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सोमवार असल्याने कळमनुरी येथे आठवडी बाजार भरला होता. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला विक्रेत्यांनी आपला माल वाचवण्यासाठी धडपड करावी लागली अचानक झालेल्या या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी धावपळ केली, तर नागरिकांनीही पावसापासून वादळी वाऱ्यामुळे नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment