नागपुरातील क्वालीलॅब इंडस्ट्रीजला ब्रेथ अनालायझर पडताळणीचा परवाना
(प्रतिनिधी : निलेश काळे)
नागपुरातील क्वालीलॅब इंडस्ट्रीज प्रा.लि. या संस्थेला भारत सरकारच्या लीगल मेट्रोलॉजी विभागाकडून ब्रेथ अनालायझर (Breath Analyzer) उपकरणांच्या पडताळणी व मुद्रांकनासाठी महाराष्ट्रातील अधिकृत परवाना प्रदान करण्यात आला आहे. शारदा नगर, हुडकेश्वर रोड नागपूर येथे कार्यरत असलेल्या संस्थेने NABL मान्यता व ISO/IEC 17025:2017 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषांची पूर्तता करून ही मान्यता मिळविली आहे या परवान्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस विभाग, वाहतूक संस्था, शासकीय विभाग व उद्योगांना राज्यातच अधिकृत आणि तांत्रिक दृष्ट्या प्रमाणित पडताळणी सेवा उपलब्ध होणार आहे.
संस्थेचे प्रतिनिधी प्रवीण मांडे यांनी सांगितले की , या मान्यतेमुळे ब्रेथ अनालायझर उपकरणांच्या पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक होणार असून वेळ व खर्चाची बचत होईल. ग्राहक संरक्षण, मापनातील अचूकता आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ उपक्रमाला चालना देणारा हा निर्णय असल्याचे मानले जात आहे. अशी माहिती प्रवीण मांडे यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment