कळमनुरी तालुक्यातील ७ केंद्रांवर पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळांच्या एकूण ७ केंद्रांवर पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण करण्यात आले असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. ९ जून २०२६ रोजी गुलाब नबी हायस्कूल, कळमनुरी येथून पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी मा. गटशिक्षणाधिकारी सोनुणे सर, शिक्षण विस्तार अधिकारी गोरे सर, खांडेकर सर, मस्के सर, दापके सर, रसाळ मॅडम, मुकाडे सर, भुरके सर, शिंदे सर उपस्थित होते. यावेळी बाभळी, वारंगा फाटा, डोंगरगाव पूल, भाटेगाव, जवळा पांचाळ, कांडली, नांदापूर आदी ७ केंद्रांसाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.
राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:
Post a Comment