वन व जलसंधारण विभागाकडून धरणाच्या हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू
सावरगाव कान्होबा येथील धरणाच्या हद्दविवादावर प्रशासकीय हालचालींना वेग
मानोरा | प्रतिनिधी :
तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील धरणाच्या हद्दविवादासंदर्भात वन तसेच मृदा व जलसंधारण विभागाकडून हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या समक्ष झालेल्या बैठकीत संबंधित विभागांकडून याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
कारंजोळा वन परिक्षेत्र कार्यालयातील नोंदी व संबंधित कागदपत्रांच्या आधारे सावरगाव कान्होबा वन क्षेत्रात काही क्षेत्र धरणात गेल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित बाबींची पडताळणी करून हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपलब्ध अभिलेख, प्रत्यक्ष परिस्थिती व संबंधित विभागांकडील माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
सदर विषय मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे ठरविले असून, आवश्यक तपासणी व अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

No comments:
Post a Comment