नेवरूळ येथे नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्सवात स्वागत
१८ जून २०२६ (वैभव कळस )
म्हसळा तालुक्यातील नेवरूळ येथे दिनांक १५ जून २०२६ रोजी शाळेच्या प्रथम दिनी न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ च्या प्रांगणात विद्यार्थीवर्गाचा प्रवेशोत्सव पार आनंदी आणि उत्सवाच्या वातावरणात पार पडला. आठवी ते दहावीपर्यंत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना पेढा भरवून व शालेय पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
त्याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन नामदेव महाडिक यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सर्व विद्यार्थ्याना तसेच उपस्थित मान्यवरांना आश्वासन दिले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून शालेय दप्तर व गणवेशासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येईल असे त्यांच्याकडून आवर्जून सांगण्यात देखील आले. तसेच व्हा. चेअरमन श्री विनोदजी लटके यांनी शाळा ही सर्वांग सुंदर बनवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस झेडपी सदस्य अभिषेक विचारे यांच्याकडून सदरचा पत्रा व नेवरूळ ग्राम विकास मंडळ व शिक्षकांच्या सहकार्याने या शाळेचा पत्रा बदलण्यात आलेला आहे. सर्व वर्गांना आतून जास्त गरम होऊ नये यासाठी सिलिंग बसवण्याचा मानस आहे आसल्याचा त्यांच्याकडून सांगण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना वहया व दप्तर घेण्यासाठी ४००० रुपयाची रोख रक्कम प्रभारी मुख्याध्यापक मिणेकर सर यांच्या स्वाधीन करण्यात आली. यामध्ये स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन नामदेव महाडिक, सरपंच सौ. श्वेता लटके, ॲड. जोहब शेख,माजी सरपंच आर्या अमित महागावकर यांच्या स्मरणार्थ अक्षय महागावकर यांच्याकडून अनुक्रमे एक हजार रुपयाची मदत करण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन माजी उपसरपंच सुनीलजी दिवेकर यांनी केले. तसेच याप्रसंगी संदीप काते,रवींद्र दिवेकर,कापसे सर,विशाल सुतार व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिणेकर सर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवळेकर सर यांनी केले.

No comments:
Post a Comment