अनसिंगच्या दत्ता कातडे यांची ‘अग्निवीर’ पदी निवड; आ.श्याम खोडे यांच्या हस्ते सत्कार
नारायण सातव अनसिंग प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलाच्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाल्याबद्दल अनसिंग येथील दत्ता कातडे यांचा वाशिम-मंगरूळनाथ मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.येथील जुने बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर आयोजित कार्यक्रमात आमदार खोडे यांनी दत्ता कातडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविले. यावेळी नथ्थुजी कापसे, विठ्ठल भाऊ सातव , डॉ . संदिप बाजड , राजकुमार मानधने , यश चव्हाण, चंद्रकांत ठाकरेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार श्याम खोडे म्हणाले, “ग्रामीण भागातील युवकाने जिद्द, मेहनत व शिस्तीच्या जोरावर भारतीय सैन्यात स्थान मिळवणे ही संपूर्ण अनसिंग गावासाठी व वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. दत्ता कातडे यांची निवड इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे. देशसेवेची संधी मिळालेला प्रत्येक युवक हा गावाचा खरा आदर्श आहे.”
सत्काराला उत्तर देताना अग्निवीर दत्ता कातडे यांनी, “गावकऱ्यांचे आशीर्वाद व आई-वडिलांच्या कष्टामुळेच मला ही संधी मिळाली. देशसेवेसाठी सदैव तत्पर राहीन,” अशी भावना व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्यास सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
दत्ता कातडे यांच्या निवडीमुळे अनसिंग गावात उत्साहाचे वातावरण असून, गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment