मानोरा तालुक्यात भारतीय संविधान प्रतींचे वाटप.
प्रत्येक आदिवासी बांधवांच्या गावात राबविण्यात येणार पुस्तक यात्रा उपक्रम
मानोरा (ता.प्र.)
पुस्तक यात्रा ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी समाजातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, आणि पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील तसेच वाशिम जिल्ह्यातील आदिवासी समाज असलेल्या प्रत्येक गावात सविधान जनजागृतीचा उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये एक ते दोन भारतीय संविधान प्रतींचे वाटप चालू करण्यात आले असून .
सदर हा जनजागृती चा उपक्रम ज्येष्ठ समाजसेवक भारत टारपे सहाय्यक आयुक्त (GST) नागपूर यांच्या संकल्पनेतून, तुकाराम भिसे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, तसेच त्यांच्या टीमने चालू केला आहे .
सदर वरील सविधान प्रत वितरणाचा कार्यक्रम वाशिम येथे दि.२ मे २०२६ रोजी उत्सहात पार पडला असता त्या वेळी २०० प्रतीचे वाटप करण्यात आले असून आता प्रत्येक तालूक्यातील आदिवासी कार्यकर्ते आदिवासी गावामध्ये जावून जस जसा वेळ मिळेल तस तसे गावातील सुज्ञ व शिक्षित तरुण तथा ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेकडे सविधान प्रती देत आहे .
जने करून ती प्रत गावातील सुशिक्षित तरुण तरुणीनी तसेच इतरांनी वाचली पाहिजे त्यामुळे आपल्याला आपले हक्क, अधिकार, कलम , कायदा ई. माहिती होईल या उद्देशाने मोफत भारतीय सविधान प्रतीचे वाटप करण्यात येत आहे.
तेव्हा मानोरा तालुक्यातील कारपा, विळेगाव, ढोणी, खांबाळा, रतनवाडी, सोमठाणा, सावळी, धामणी व ईतर गावात करण्यात आले आहे .
यासाठी तालुक्यातील आदिवासी कार्यकर्ते मंडळी प्रती वाटप करण्यासाठी परीश्रम घेत आहे .

No comments:
Post a Comment