महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामध्ये झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षणास सुरुवात
ग्रामपंचायत मधील मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या कामाचे सामाजिक लेखा परीक्षण
मानोरा ता. प्र :-
तालुकायातील ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2025-26 मध्ये झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण सर्व ग्रामपंचायत मध्ये करण्यात येत आहे.
भारतात सामाजिक लेखापरीक्षण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA): या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सामाजिक लेखापरीक्षण अनिवार्य केले गेले आहे, जेणेकरून मजुरांचे पैसे आणि कामाचा दर्जा तपासावा पंचायती राज ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे ऑडिट करून ग्रामसभेत अहवाल सादर केला जाणार आहे.सामाजिक लेखापरीक्षणाचे प्रमुख उद्देश पारदर्शकत कामात ठेवणे.
सरकारी योजना किंवा संस्थांच्या कामात नागरिकांना माहिती देणे आणि भ्रष्टाचार रोखणे,जनतेच्या पैशांचा योग्य वापर होत असल्याची खात्री करणे, स्थानिक नागरिकांना आणि लाभार्थ्यांना निर्णय प्रक्रियेत आणि अंमलबजावणीत सहभागी करून घेणे,सामाजिक लेखापरीक्षण यामध्ये कामाची माहिती करणे संबंधित योजनेवर किती खर्च झाला आणि काय काम झाले याची कागदपत्रे तपासणी करावी लागते. ग्रामसभा घेऊन जनसुनावणी करणे आणि गावातील नागरिकांसमोर हे सर्व तपशील वाचून दाखवणे आणि खुली चर्चा घडवून आणणे. तक्रार निवारण करणे जर कामात त्रुटी किंवा भ्रष्टाचार आढळल्यास त्यावर आक्षेप घेणे आणि योग्य कारवाईची मागणी करणे अशी विविध नागरिकांना माहिती करून द्यावी लागते.
सदर सामाजिक अंकेशन मध्ये फळबाग लागवड, जलसिंचन विहीर, वृक्ष लागवड बांबू लागवड, जलतारा व रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया मानोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येत आहे झालेल्या कामांची तपासणी करून तो अहवाल शासनास सादर होणार आहे. ग्रामपंचायत निहाय सामाजिक अंकेशन प्रक्रिया चे चार फेरी राहणार आहे. प्रथम फेरीत 19 ग्रामपंचायत दि. 24 मे ते 30 मे पर्यन्त आणि 31मे ला ग्रामसभा होणार, दुसरी फेरी यामध्ये 18 ग्रामपंचायत
दि.1 जून ते 7 जून आणि 8 जून ला ग्रामसभा राहील, तिसरी फेरी मध्ये 19 ग्रामपंचायत दि. 9 जून ते 15 जून आणि 16 जून ग्रामसभा, चौथी फेरी 20 ग्रामपंचायत दि. 17 जून ते 23 जून ग्रामससभा दि 24 जून राहील आणि तालुका ठिकाणी पंचायत समिती सभागृहात दि. 27 जून जण सुनावणी आहे.
याकरिता सर्व ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक व गावातील सर्व ग्रामस्थांनी या प्रक्रियेला सहकार्य करावे असे आवाहन
सामाजिक अंकेशन कर्मचारी प्रशांत दामले यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment