ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे २० जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय महाअधिवेशन; या दिवशी 60 हजार कर्मचारी एकवटणार

 



प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव (छत्रपती संभाजीनगर:)

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि वेतनश्रेणी लागू करण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन'च्या वतीने येत्या २० जून २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन लाडगाव येथील आदिती लॉन्सवर दुपारी २:०० वाजता पार पडणार असून, यामध्ये संपूर्ण राज्यातील सुमारे ६० हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे अध्यक्षपद माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू भाऊ कडू भूषवणार आहेत. याशिवाय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मंत्री व आमदार विशेष उपस्थित राहणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या:

वेतनश्रेणी लागू करणे: राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी.

अनुषंगिक मागण्या: जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवा संरक्षण देणे, वैद्यकीय सुविधा पुरवणे, वेळेवर वेतन देणे, पदोन्नती आणि इतर सर्व शासकीय सुविधा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणे.

या महाअधिवेशनासाठी  युनियनचे जिल्हा अध्यक्ष बापू मोरे जिल्हा उपाध्यक्ष निसार भाई शेख, दत्ता मांडे, पिनु पाटील ढिकले आणि जिल्हा मते साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष, सचिव व कर्मचारी यांची तयारी सुरू आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, 

 अशी आशा युनियनने व्यक्त केली असून या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी हा घटक ग्राउंड लेव्हल वरती काम करणारा असून त्याच्या समस्या खूप आहे परंतु या समस्येचा निराकारण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री तसेच आमच्या संघटनेचे राज्य अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा बाळगून आम्ही सर्व कर्मचारी आहोत  सुभाष घोलप विभागीय अध्यक्ष नाशिक जिल्हा 

No comments:

Post a Comment