प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे: कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कडक बाणा



 ग्रामीण प्रतिनिधी  न्यूज-शरद धाडगे 

आगामी १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून शाळा-कॉलेज गजबजणार आहेत. मात्र, नेवासा तालुक्यातील पिचडगाव-गेवराई मार्गे चालणारी नेवासा-दहिगाव ही एसटी बस सेवा गेल्या काही काळापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ही बंद असलेली बस सेवा तातडीने आणि पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश जगताप यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आगारप्रमुखांना निवेदनही दिले आहे.

पूर्वी नेवासा ते दहिगाव मार्गे पिचडगाव-गेवराई अशी एसटी बस सेवा दिवसातून दोन वेळा सुरू होती. मात्र, दरम्यानच्या काळात रस्ता अत्यंत खराब झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाकडून ही बस सेवा बंद करण्यात आली होती.

विद्यार्थी आणि वृद्धांचे हाल; पालकांमध्ये चिंता

या बस मार्गावरील म्हसले, पिचडगाव, गोंडेगाव, दिघी, नजिक चिंचोली आणि गेवराई या ६ ते ७ गावांतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि वयोवृद्ध नागरिकांची सध्या मोठी गैरसोय होत आहे. या गावांमधील शेकडो विद्यार्थी दररोज त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, ज्ञानेश्वर महाविद्यालय तसेच इतर शाळा-कॉलेजांमध्ये शिक्षणासाठी जातात. शाळा सुरू होणार असल्याने या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या एसटी बंद असल्यामुळे प्रामुख्याने विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच वयोवृद्धांना दवाखान्यात जाण्यासाठीही पायपीट करावी लागत आहे.

रस्ता दुरुस्ती पूर्ण, मग अडचण काय?

सध्या नेवासा ते गेवराई दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, रस्ता पूर्णपणे नवीन व सुसज्ज झाला आहे. त्यामुळे खराब रस्त्याचे कारण आता संपले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी नेवासा आगाराने ही नेवासा-दहिगाव एसटी बस दिवसातून दोन वेळा पूर्ववत सुरू करावी, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा सूर आता उमटू लागला आहे.

-


No comments:

Post a Comment