स्वरधारा परिवारातर्फे ‘मेरे महबूब न जा...’ संगीत संध्या १३ जून रोजी



(नागपूर प्रतिनिधी : निलेश काळे)

नागपूर, दि. १२ जून :स्वरधारा परिवार, नागपूर यांच्या वतीने सदाबहार हिंदी चित्रपट गीतांवर आधारित विशेष संगीत कार्यक्रम ‘मेरे महबूब न जा...’ याचे आयोजन शनिवार, १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सीताबर्डी येथील ‘उत्कर्ष’ हिंदी मोर भवन येथे होणार असून प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य राहणार आहे. या संगीतमय कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन ज्येष्ठ गायक चंद्रशेखर तासगांवकर यांनी केले आहे. कार्यक्रमात जुन्या आणि लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांची बहारदार मैफल रंगणार असून नागपूरमधील नामवंत गायक- गायिका आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमात श्रीकांत पैठणकर, चेतन एलकुंचवार, शेखर जोगवार, श्रद्धा डाऊ, रोहिणी पाटणकर, मानसी बढे आणि शालिनी शुल्ला हे कलाकार सदाबहार गीतांचे सादरीकरण करतील. कार्यक्रमाचे निवेदन अशोककुमार गांधी यांनी केले असून तांत्रिक सहकार्य संजय कुलकर्णी यांचे लाभणार आहे. सुवर्णकाळातील हिंदी चित्रपट संगीताच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देणाऱ्या या संगीत संध्येचा आनंद घेण्यासाठी नागपूरातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वरधारा परिवारातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमातून रसिकांना जुन्या हिंदी चित्रपटसंगीताचा सुरेल आणि भावस्पर्शी अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.


No comments:

Post a Comment