वडगाव येथे लखाबाई व मांगिरबाबा यात्रोत्सव संपन्न.



पत्रकार:- मोहन जाधव.चास(नळी):- 

                कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे गुरुवर्य प्रकाश मुरलीधर माळी व गुरुवर्य रंगनाथ बाबा आसुले यांच्या कृपा आशीर्वादाने यात्रोत्सव आयोजित केलेला होता. सदर यात्रोत्सव शनिवार २५/०४/२०२५ पासून यात्रेला प्रारंभ झालेला असून यात्रेच्या पहिल्या दिवशी पालखी मिरवणूक व घटस्थापनेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर प्रत्येक दिवशी सायंकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम व भोजनाची व्यवस्था केली होती. तसेच यात्रेच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक ०१/०५/२०२६ रोजी काठी व पालखी मिरवणूक काढली होती आणि सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गावांमध्ये दोन प्रकारच्या यात्रा भरत असतात. एक शनी महाराजांची तर दुसरी खंडोबा महाराजांची मात्र आता आणखी एक म्हणजेच लखाबाई व मांगीरबाबा यांच्याही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला परिसरातून अनेक भाविक यासाठी येत असतात दरवर्षीप्रमाणे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम वाजत गाजत मोठे उत्साहात आनंदात साजरा केला जातो. हे दृश्य बघण्यासाठी आजूबाजूचे परिसरातील शेकडो भाविक आपल्या कुटुंबासमवेत हजेरी लावत असतात. यंदाच्या यात्रेचा मान सुनील देवराम जाधव यांना मिळाला होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी उत्कृष्ट पद्धतीने केले होते.

No comments:

Post a Comment