कोपरगाव येथील महावितरण वीज कर्मचाऱ्यांचा गौरव संपन्न.


पत्रकार:- मोहन जाधव.

                     कोपरगाव (ग्रामीण) येथील संवत्सर कक्षाचे वरिष्ठ यंत्रचालक अनिरुद्ध दिलीप पगारे तसेच येसगाव कक्षाचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश सर्जेराव भाकरे या दोन्ही वीज कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नाशिक परिमंडळाच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी, वीज बिल वसुली, ग्राहकांच्या हितासाठी केलेले कार्य तसेच कंपनीच्या सेवेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे सन २०२५-२०२६ या वर्षाचा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदरराव लटपटे यांच्या हस्ते अनिरुद्ध पगारे व निलेश भाकरे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार यंत्रचालक कर्मचाऱ्यांसाठी डिव्हिजनमधून एका व्यक्तीला तर लाईन स्टाफसाठी सब-डिव्हिजनमधून एका उत्कृष्ट कर्मचाऱ्यास दिला जातो.

                                या सन्मानानिमित्त दोन्ही वीज कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे.

No comments:

Post a Comment