खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर यांना मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
दर्यापूर प्रतिनिधी दिपक मेश्राम
दर्यापूर मध्ये तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मेलोडी वाटून केंद्र सरकारच्या महागाई विरोधात अनोखे आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी पार पडले. प्रसंगी खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी तहसीलदार दर्यापूर रवींद्र कानडजे यांना मेलोडी देत व निवेदन देत केंद्र व राज्य सरकारकडून होत असलेल्या वाढत्या महागाई विरोधात निषेध नोंदविला. यावेळी - सुनीलभाऊ गावंडे ( सभापती कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , श्रीरंग पाटील अरबट , बाळासाहेब टोळे , दिनकर रावजी गायगोले , आतिशभाऊ शिरभाते ( शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , भारतभाऊ आठवले ( संचालक कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , संजूभाऊ बेलोकार ( महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण ) , इंजि. नितेश वानखडे ( महासचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र ) , शिवाजीराव देशमुख ( माजी सभापती न.प दर्यापूर ) , अस्लमभाई गाणीवाले , ऍड. हेमराज धांडे,सागर देशमुख ( तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस दर्यापूर ), राजेश्वर पाटील कोल्हे, राजू नागे, सुनील डोंगरदिवे,सचिन धुवे, साहेबराव रायबोले, प्रमोद गवई, दादा इंगळे, दिलीप गवई,तेजस नितनवरे, निलेश मेश्राम, विनोद सदाशिव, राहुल खडे,रत्नदीप वानखडे,संतोष आठवले,जगदीश कांबे यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक , खरेदी विक्री संघाचे संचालक , तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी , युवक काँग्रेसचे सदस्य , नगरसेविक , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment