टेंभुर्णी येथे श्रीमद भागवत कथा सोहळ्यास प्रारंभ.


टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना) विष्णु मगर

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील श्री सावता मंगल कार्यालयात श्रीमद  भागवत कथा सोहळ्यास आज दिनांक 29 मे शुक्रवार पासून प्रारंभ झाला असून हा श्रीमद् भागवत कथा सोहळा दिनांक 4 जून 2026 पर्यंत चालणार आहे. 

सालाबादप्रमाणे तसेच अधिक मासानिमित्त या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे .टेंभुर्णी येथील श्री महालक्ष्मी महिला भागवत सेवा समितीच्या वतीने या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे .आज दिनांक 29 मे रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार आहे.  त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील गोपी सोनगिरी येथील गोपेश्वर आश्रमाचे मठाधिपती राघव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ होणार आहे. या श्रीमद् भागवत कथेचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी महिला सेवा समितीच्या कुसुमबाई पंडित ,वंदना डोईफोडे, कांताबाई भोपळे ,मंडाबाई डोमळे ,कल्पना डोईफोडे, कुंता गीते ,सुमनबाई टिकटे, सुनिताबाई बेंद्रे, प्रतिभा डोमळे ,मुक्ता नवले ,शोभा भुतेकर, गुंड मॅडम आदींनी केले आहे.


No comments:

Post a Comment