नशायुक्त अमली पदार्थांची सर्रास विक्री
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत शहरातील एक अत्यंत चिंताजनक आणि गंभीर विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधले. कोल्हापूर शहरातील काही पानपट्ट्या आणि अनधिकृत दुकानांमधून गुटखा, सिगारेट तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या नशायुक्त अमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे.
या नशेच्या आहारी अवघ्या १३-१४ वर्षांची शाळकरी मुले जात असून, त्यांच्या दप्तरांमध्ये अशा नशायुक्त वस्तू सापडणे ही संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. या भीषण समस्येमुळे तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.
सभागृहात प्रशासनाकडे केलेल्या आमच्या प्रमुख मागण्या:
१) केवळ पोलीस प्रशासनावर विसंबून न राहता महापालिकेच्या आरोग्य विभागाने यात थेट पुढाकार घ्यावा.
२) अवैध अमली पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर आणि पानपट्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये (Ward-wise) विशेष भरारी पथके नेमण्यात यावीत.
३) असे घातक व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करून ती दुकाने कायमची 'सील' (Seal) करण्यात यावीत.
कोल्हापूरचे भविष्य असणाऱ्या युवा पिढीला या व्यसनाधीनतेच्या गर्तेतून वाचवण्यासाठी आमचा हा लढा आणि प्रयत्न कडकपणे सुरूच राहील.असे शारंगधर देशमुख (नगरसेवक - कोल्हापूर महानगरपालिका)यांनी सांगितले a

No comments:
Post a Comment