रौप्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
विठ्ठलाई शिक्षण सेवा मंडळ, दुर्गमानवाड संचलित आ. महादेवराव महाडिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या रौप्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले.
राधानगरी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी उभारण्यात आलेले आ. महादेवराव महाडिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दुर्गमानवाड यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचत असून शेकडो विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असते, मात्र योग्य सुविधा आणि संधींचा अभाव अनेकदा त्यांच्या प्रगतीत अडथळा ठरतो. अशा दुर्गम भागात उभ्या राहणाऱ्या शैक्षणिक संस्था केवळ शिक्षण देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचे कार्य करतात. आधुनिक शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संस्थेमार्फत होत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पाहून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, हीच अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री. भगवानराव साळुंखे, केडीसीसी बँकेचे संचालक श्री. ए. वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री. सागर धुंदरे, शिक्षक नेते श्री. दादा लाड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणपती गुंडू पाटील, पंचायत समिती सदस्य श्री. संग्रामसिंह कलिकते, सौ. पूनम पाटील, अपर सचिव श्री. वसंत पाटील, शिक्षक बँकेचे चेअरमन श्री. एस. व्ही. पाटील, व्हाईस चेअरमन श्री. गजानन कांबळे, श्री. प्रमोद तौंदकर, सरपंच सौ. मंदिरा कांबळे, श्री. रणजीत पाटील, श्री. युवराज पौंडकर, उपसरपंच श्री. सर्जेराव पाटील, श्री. के. डी. पाटील, श्री. बाबासाहेब पाटील यांच्यासह श्री. राजेंद्र पाटील, श्री. तानाजी पाटील, श्री. आर. डी. पाटील आदी मान्यवर आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment