आ. डॉ. प्रज्ञाताई सातव यांची राज्य तपासणी व सहनियंत्रण समिती सदस्यपदी निवड
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
महिलांचे आरोग्य, पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवांमधील पारदर्शकता तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य तपासणी व सहनियंत्रण समितीच्या सदस्यपदी आ. डॉ. प्रज्ञाताई सातव यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. प्रज्ञाताई सातव यांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सुविधांच्या
दर्जाची तपासणी करणे, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी सुनिश्चित करणे, सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
या निवडीमुळे मराठवाड्यातील महिला आरोग्य आणि बाल लिंग गुणोत्तर सुधारण्याच्या कामाला बळ मिळणार असून महाराष्ट्रात मुलींचे घटते प्रमाण ही गंभीर समस्या असून ती रोखण्यासाठी ही समिती केंद्रांची अचानक तपासणी करून कारवाई करण्याचे अधिकार या समितीला आहेत. या निवडीनंतर डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आरोग्य विभागाच्या या महत्त्वाच्या समितीच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि विशेषतः माता-बाल विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

No comments:
Post a Comment