'म्हसळा तालुक्यातील जेष्ठ नाटककार, संगीतकार शांताराम बोरकर यांचे ९६ व्या वर्षी निधन
(वैभव कळस )
शहरातील जेष्ठ नाटककार, शास्त्रीय संगीत वेडे, सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रात सुपरिचित आणि मानाचे स्थान असलेले प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक शांताराम आत्माराम बोरकर यांचे दिनांक २६ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९६ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली, सुना,जावई, नातवंडे,पतवंडे तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. शांताराम बोरकर यांना संगीत,भजन आणि धार्मिक कार्याची विशेष आवड होती.समाजातील विविध उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच उत्साहाने सहभाग घेतला होता.राजकीय क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचे निष्ठेने कार्य केले.त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा प्रभाव पुढील पिढीवरही दिसून आला.
त्यांचे पुत्र शीतल उर्फ भाई बोरकर तसेच त्यांच्या सुनबाई कविता बोरकर यांना ग्रुप ग्रामपंचायत व नगरपंचायतीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी लाभली.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच म्हसळा शहरासह तालुक्यातील सामाजिक,राजकीय,धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या निधनाने म्हसळा शहरातील एक कडक शिस्तप्रिय, ज्येष्ठ,प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment