नवोदय प्रवेशात सारा शेखची ९९ टक्के गुणश चमकदार कामगिरी



श्रीगोंदा प्रतिनिधी:- प्रा. अशोक राहिंज 

पिंप्री कोलंदर (ता. श्रीगोंदा) येथील सारा निसार शेख हिने नवोदय प्रवेश परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून तिची पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर साठी निवड झाली आहे. अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या या परीक्षेत तिने मिळवलेले गुण विशेष उल्लेखनीय मानले जात आहेत.

सारा ही सुप्रसिद्ध शाहीर निजामभाई शेख यांची नात तसेच पराक्रमा शैक्षणिक संकुलाचे प्राध्यापक दाम्पत्य प्रा. डॉ. निसार शेख व प्रा. डॉ. जस्मीन शेख यांची कन्या आहे. ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हातार पिंप्री येथील विद्यार्थिनी असून शालेय जीवनात यापूर्वीही तिने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. मुख्याध्यापक शरद गावडे,  वर्गशिक्षक विठ्ठल शिंदे, शैला गावडे आणि सुनिता ढवळे-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश संपादन केले.

साराने नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करण्याची तिची इच्छा आहे.

तिच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमींनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


No comments:

Post a Comment