दर्पण मधील बातमीची दखल ;उपनगरध्यक्षांनी केली पाहणी



 प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत 

  दोन दिवसापूर्वी दै . दर्पण मध्ये सांगोला - अथणी महामार्गावरील खड्या संबंधी बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याची दखल घेऊन जत चे डॅशिंग व कार्यसम्राट उपनगराध्यक्ष मा . विक्रम दादा ताड यांनी त्या जागेची पाहणी करून लगेच फोन वरून नगरपालिकेत सूचना केल्या .

 गेली एक महिन्यापासून गटारीचे काम पूर्ण न झाल्याने तेथील खड्डा मुजवण्यात आला नाही व त्याला बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले आहे सांगोला - अथणी महामार्ग असल्याने तेथून दररोज हजारो वाहने ये जा करतात त्यामुळे तेथे वारंवार ट्राफिक जॅम ची समस्या उदभवत आहे .

ट्राफिक जॅम व खड्यामुळे अपघात पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही उपनगरध्यक्ष विक्रम दादा ताड यांनी तिथे पाहणी करून हि सर्व समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले आहे . 

यावेळी तेथील व्यापारी रुबाब हैद्राबादे व इतर नागरिकांनी विक्रम दादा ताड यांचे आभार मानले व लवकरात लवकर गटारीचे व्यवस्था करावी हि विनंती केली 


No comments:

Post a Comment