यमुनाबाई कु-हे महाविद्यालयात पारंपरिक खेळाचे आयोजन.



दर्पण न्यूज (नेवासा) प्रतिनिधी:नवनाथ घावटे.

सोमवार दि ६ एप्रिल रोजी  वडाळा बहिरोबा येथील यमुनाबाई कु-हे बीएड महाविद्यालयात बी एड कोर्स कोड २०६ अ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे तसेच शारीरिक तंदुरुस्ती आणि संघभावना वाढविणे हा होता.

या कार्यक्रमातंर्गत लंगडी, कबड्डी, दोरीखेच, भिंगरी, लगोरी, संगीत खुर्ची अशा विविध पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि खेळांचा आनंद लुटला. स्पर्धात्मक वातावरणातही खेळाडूंनी शिस्त, संयम आणि सहकार्याची भावना जपली.

या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रा. मंडलिक पी डी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारंपरिक खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. “आजच्या डिजिटल युगात पारंपरिक खेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत,” असे ते म्हणाले.

तसेच या कार्यक्रमास प्रा. घावटे बी सी यांचे मार्गदर्शन व प्रा शिंदे बी बी यांचे सहकार्य लाभले . 

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment