तोंडापूर पाटी जवळ स्कुलबसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

आखाडा बाळापूर कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा शिवारात स्कुल बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. ४ दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातांनतर शाळा प्रशासनाने तब्बल एक तासानंतर दुसरी बस पाठवून विद्यार्थ्यांना घरी सोडले. या प्रकारामुळे पालकांतून तिव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वारंगाफाटा येथील साई इंग्लीश स्कुलची बस नेहमी प्रमाणे आज दुपारी विद्यार्थी घेऊन त्यांच्या गावाकडे निघाली होती. या बसमध्ये तब्बल ५० ते ५५ विद्यार्थी बसविले होते. सदर स्कुलबस तोंडापूर, दांडेगाव, डिग्रस, रामेश्वर येथील विद्यार्थी सोडण्यासाठी निघाली होती. सदर बस आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर तोंडापूर शिवारात आली असतांना चालकाने समोरून पायी येणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक दिली.

 या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुष्ठे, जमादार शेख बाबर, शिवाजी पवार यांच्यासह गावकरी घटनास्थळी धावले. त्यांनी सदर जखमीला तातडीने उपचारासाठी नांदेडला हलविले मात्र त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. रामराव गोपाळराव कपाळे (६५) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातानंतर बसमधील विद्यार्थी घाबरून रडू लागले. त्यानंतर काही गावकरी व चालकाने विद्यार्थ्यांचे त्यांचा पालकांशी बोलणे करून दिले. शाळा प्रशासनाकडे तातडीने दूसरी बस पाठविण्याची विनंती करण्यात आली. मात्र गांभीर्य नसलेल्या शाळा प्रशासनाने तब्बल एक तासानंतर दुसरी बस पाठवून विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी नेऊ सोडले. या प्रकारामुळे पालक व नागरीकांनी तिव्र संताप व्यक्त केला. एकाच बसमध्ये क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थी बसविणाऱ्या शाळा प्रशासनावरही कारवाई केली पाहिजे अशी चर्चा सुरु होती. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment