कर्ज व नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथे कर्ज व नापिकीला कंटाळून तरूण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी दि. ४ अकस्मात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी सचिन धांडे (२७) यांना पिंपरी शिवारात अडीच एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो, त्यांच्या वडिलांच्या नावे सुमारे १० लाख रूपयांचे कर्ज आहे. सचिन हे घरातील कर्ता पुरुष असल्याने त्याच्यावरच सर्व कुटुंबाची जबाबदारी होती, वडिलांच्या नावे असलेले कर्ज कसे फेडायचे यांची चिंता त्यांना लागली होती.
सचिन यांनी त्यांच्या शेतात घेतलेले खरीप व रब्बी हंगामाचे पिक वाया गेले. शेतीतून ऊत्पन मिळाले नसल्यामुळे कर्ज कसे फेड़ावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असे ते सतत बोलून दाखवत होते. मात्र आज ना उद्या या कर्जाची फेड होईल असे त्यांचे कुटुंब समजावून सांगत होते. पिंपरी गावात सप्ताह असल्यामुळे शुक्रवारी दि. ३ रात्रीच्या वेळी भोजनाची पंगत होती, पंगत वाढल्यानंतर रात्रीच्या सुमारास ते घरी गेले यावेळी त्यांनी घरातील छताला साडीनेगळफास घेतला काही वेळानंतर त्यांनी पत्नी काही कामासाठी घरात आली असतांना सचिनांचामृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळूनआला. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर सचिन यांना खाली काढून रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणी गणेश धांडे यांच्या माहितीवरून आखडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, उपनिरीक्षक गणेश घोटके पुढील तपास करीत आहेत.
.jpg)
No comments:
Post a Comment