कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा शहरासह व तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी आर ओ प्लांटचे लोकार्पण
करमाळा प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे
करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली कै बाबूराव( तात्या) गायकवाड प्रतिष्ठान च्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात. आज या प्रतिष्ठान च्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना वीस रू खर्च करून बिसलेरी पाणी घेणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन भवानी नाका येथे स्वखर्चाने १ रूपयात आर ओ फिल्टर चे एक लीटर व १० रू यात १५ लिटर थंडगार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आर ओ फिल्टर बसवला आहे. आज सर्व पत्रकार बांधव व सर्वपक्षीय नगरसेवक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रतिष्ठान कडून दरवर्षी उन्हाळ्यात वनविभागातील पाणवठ्या मध्ये पशू पक्षांसाठी टॅंकर ने पाणी पुरवठा तसेच चारा म्हणून तांदूळ ठेवण्याचे नियोजन केले जाते. गोरगरीब गरजूंना फायदा व्हावा या हेतूने प्रत्येक घरातील आपल्या वापरात नसलेले कपडे,बूट, ब्लँकेट अशा वस्तू देण्याची अवहान करून ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम अनेक वर्ष चालवला या उपक्रमाचा मजूर ,गोरगरीब, निराधार लोकांना मोलाचा फायदा झाला.
भविष्यात देखील सर्वसामान्य लोकांना फायदा होईल या भावनेनं सामाजिक कार्यातून हातभार लावणार असल्याचे प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले.
.jpeg)
No comments:
Post a Comment