सुपतगाव च्या शिरपेचात मानाचा तुरा आरती सिद्राम लामजणे यांची 'पुणे शहर पोलीस' दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड




उमरगा,,प्रतिनिधी 

उमरगा तालुका येथील सुपतगाव  येथील अत्यंत कष्टाळू आणि होतकरू तरुणी कु आरती सिद्राम लामजणे हिने आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर 'पुणे शहर पोलीस' दलात पोलीस कॉन्स्टेबल (पोलीस शिपाई) या पदावर घवघवीत यश संपादन केले आहे. नुकतीच तिची या पदावर अधिकृत नियुक्ती झाली आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण सुपतगाव परिसरातून आणि तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कु आरती हिची घरची परिस्थिती अत्यंत सर्वसाधारण असतानाही तिने हार न मानता आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवले. अत्यंत चिकाटीने अभ्यास आणि मैदानी चाचणीची तयारी करून तिने हे यश संपादन केले आहे. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे तिचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.

आरती हिच्या या यशाबद्दल बोलताना तिच्या कुटुंबीयांनी अत्यंत आनंद व्यक्त केला असून, "तिच्या कष्टाचे आज चीज झाले," अशा भावना व्यक्त केल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि चिकाटी ठेवली, तर त्या कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात, हेच आरतीने आपल्या यशा तून सिद्ध करून दाखवले आहे.

तिच्या या दैदींप्यमान यशाबद्दल सुपतगाव चे ग्रामस्थ, सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईक व येणेगुर येथील आरतीचे मामा श्री शिवानंद गावकरे व नातेवाईककडून श्री आरती हिचे शाल श्रीफळ व फेटा बांधून विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आले असून तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत

No comments:

Post a Comment