नजिक चिंचोली येथे पंचदिनी नामचिंतन सप्ताह उत्साहात संपन्न



 प्रतिनिधी :नामदेव सरोदे  नेवासा 

नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथे सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या कृपाआशीर्वादाने व सदगुरू ह.भ.प. महादेव महाराज धाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास बाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य दिव्य पंचदिनी नामचिंतन, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.

दि. 24 एप्रिल ते 28 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडलेल्या या सप्ताहात दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागांतील कीर्तनकार, प्रवचनकार व साधक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणाचा लाभ घेतला. सप्ताहादरम्यान परिसरात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सप्ताहाची सांगता सदगुरू ह.भ.प. महादेव महाराज धाडगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने अत्यंत उत्साहात व भक्तिरसात झाली. त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहामुळे साधकांना नामभक्तीची प्रेरणा मिळाली असून ग्रामस्थ व भाविकांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, साधक-भक्त व ग्रामस्थांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment