पाली, बोरखेड, नाळवंडीत मतदानाचा उत्साह गुलाल कुणाचा ? बुधवारी तहसील कार्यालयात फैसला!



प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे...


      राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार बीड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम प्रशासनाकडून अत्यंत चोखपणे राबवण्यात आला . या प्रक्रियेत सहा ग्रामपंचायतींमध्ये केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने तेथे मतदानाची गरज भासली नाही , तर उर्वरित तीन ग्रामपंचायतींसाठी २८ एप्रिल रोजी नऊ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली . यामध्ये पाली ६७, बोरखेड ६३ तर नाळवंडी ६५ टक्के मतदान झाल . सहा ठिकाणी मतदानाची गरज उरली नाही .

      निवडणूक जाहीर झालेल्या नऊ ग्रामपंचायतींपैकी साखरे बोरगाव , वांगी , पिंपळनेर , तांदळवाडी भिल्ल आणि सावरगाव घाट या पाच ठिकाणी सदस्य पदासाठी प्रत्येकी केवळ एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाले . तसेच घोसापुरी येथे सरपंच पदासाठी देखील एकच वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने , या ठिकाणी निवडणूक घेण्याची आवश्यकता भासली नाही .

दुसरीकडे, साखरे बोरगाव येथील सरपंच पदासाठी वैध अर्ज असणाऱ्या उमेदवाराचे दुर्दैवी निधन झाल्याने जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार येथील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे .

       पाली, बोरखेड आणि नाळवंडीत शांततेत मतदान : 

पाली, बोरखेड आणि नाळवंडी या तीन ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आज मतदारांनी आपला हक्क बजावला . या प्रक्रियेसाठी २३ एप्रिल रोजीच मतपेट्यांचे सीलिंग करण्यात आले होते . मंगळवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली . या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण मोरे (पाली) , कल्याण शेळके (बोरखेड ) आणि विनायक येळंबकर (नाळवंडी) यांनी जबाबदारी सांभाळली.

       तहसीलदार व नायब तहसीलदारांचे सूक्ष्म नियोजन :- 

ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यामागे प्रशासकीय यंत्रणेचे विशेष नियोजन आहे . चंद्रकांत शेळके ( तहसीलदार बीड )तथा निवडणूक निर्णय प्राधिकृत अधिकारी म्हणून त्यांनी सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींचे नेतृत्व केले . त्यांच्या अचूक नियोजनामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली .

सुहास हजारे , निवासी नायब तहसीलदार यांनी निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून त्यांनी मतदान केंद्रांवरील व्यवस्था , कर्मचाऱ्यांचे नियंत्रण आणि तांत्रिक बाबींचे यशस्वी संचलन केले .

    प्रशासकीय सहकार्य आणि निकालाची उत्सुकता :- या महत्त्वपूर्ण कामकाजात महादेव चौरे , संतोष मुळीक , तुकाराम जाधव आणि विवेक कोळपकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत निवडणूक यंत्रणेला मोलाचे सहकार्य केले . आज मतदान झालेल्या तीनही ग्रामपंचायतींची मतमोजणी दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी तहसील कार्यालय बीड येथे पार पडणार आहे . आता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

No comments:

Post a Comment