ग्रामपंचायत खापरदरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न



 प्रतिनिधी: जगदीश राठोड

खापरदरी ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत परिसर जयभीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नायक, कारभारी, पंचमंडळ तसेच महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून समाजसेवक सोपानभाऊ राठोड यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांवर चालत समाजात समानता आणि बंधुता टिकविण्याचा संकल्प केला.


No comments:

Post a Comment