तलवार दाखवत स्टेट्स, आरोपीवर कारवाई
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
सोशल मीडियावर हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याच्या उद्देशाने फोटो शेअर करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध स्थानिक - गुन्हे शाखा व कळमनुरी पोलिसांनी - तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन - यांच्या सूचनेनुसार अवैध कृत्यांविरोधात - कठोर मोहीम राबवली जात आहे. त्याच - अनुषंगाने १३ एप्रिल २०२६ रोजी सोशल - मीडिया पेट्रोलिंगदरम्यान संबंधित - तरुणाने हातात तलवार घेऊन फोटो पोस्ट केल्याची माहिती पोलिसांना - मिळाली. या प्रकरणी आरोपी सचिन गणेश बोराडे (वय २४, रा. माळी - गल्ली, कळमनुरी) याला ताब्यात
घेण्यात आले असून त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. कळमनुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment