महाराष्ट्र राज्य शिक्षक - शिक्षकेतर सेना बुलडाणा जिल्हाप्रमुखपदी प्राचार्य वसंतराव गाडेकर यांची नियुक्ती

 



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

चिखली :  महाराष्ट्र राज्य शिक्षक - शिक्षकेतर सेना या संघटनेच्या बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदावर प्राचार्य वसंतराव गाडेकर यांची नुकतीच एका आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली असून भारताचे कॅबीनेट मंत्री मा. नामदार श्री . प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या हस्ते प्राचार्य  गाडेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे .

        याबाबत असे की , हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख  स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री मा . ना . श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने प्राप्त झालेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र राज्य शिक्षक - शिक्षकेतर सेना राज्याध्यक्ष आमदार श्री किशोर दराडे यांच्या स्वाक्षरीने तसेच बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर संजयजी गायकवाड आणि संघटनेच्या मार्गदर्शक आमदार मनिषाताई कायंदे व  मा. शिक्षक आमदार श्रीकांतजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळ नवघरे येथे कार्यरत असलेले प्राचार्य वसंतराव गाडेकर यांची बुलडाणा जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे असे राज्याचे उपाध्यक्ष मा श्री दिलीप सुर्यवंशी यांनी दिलेल्या  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

      प्राचार्य वसंतराव गाडेकर यांची शिक्षक सेनेच्या बुलडाणा जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर सदर नियुक्तीपत्र भारताचे कॅबिनेट मंत्री मा . ना . प्रतावरावजी जाधव यांच्या हस्ते चिखली येथे स्विकारण्यात आले असून यावेळी शिवसेना संघटनेचे राज्यउपाध्यक्ष संजय तायडे पाटील, सेना जिल्हाप्रमुख ओमसिंगदादा राजपूत , भास्करभाऊ राऊत , अमरावती विभाग शिक्षक मतदार नोंदणी प्रमुख उपेंद्र पाटील , विभागीय सचिव अर्जून देशमुख , चिखलीच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा सौ . वैशालीताई कपिल खेडेकर ,  शिवाजीराव देशमुख , सौ . मायाताई गजानन म्हस्के , कपिलदादा खेडेकर , प्राचार्य गजानन मोरे , विलासभाऊ घोलप , रामबापू देशमुख , माजी जि . प . सदस्य शरदनाना हाडे ,  राजू पाटील , बाळू वराडे , कैलास भालेकर , जितेंद्र पुरोहीत , गोपीनाथ लहाने , रवि भगत , अनिल जाधव , भूजंगराव जाधव यांचेसह असंख्य शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:

Post a Comment