लाडकी बहीण' योजनेसाठी ३० एप्रिलपर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी — सोयगाव तालुक्यातील महिलांना मनोहर सोनवणे यांचे आवाहन



सोयगाव प्रतिनिधी..दिलीप मोरे..

सोयगाव, दि.०३ — राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र असूनही अनेक महिलांना e-KYC पूर्ण करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांना दिलासा देत शासनाने ३० एप्रिल २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्ती करण्याची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे.

सोयगाव तालुक्यासह परिसरातील पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मनोहर डी. सोनवणे यांनी केले आहे. अनेक महिलांचे आधार लिंकिंग, बँक खाते तपशील, मोबाईल क्रमांक किंवा अर्जातील तांत्रिक त्रुटींमुळे लाभ प्रलंबित राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांनी खालील बाबी तपासून घ्याव्यात असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले :

आधार कार्ड व बँक खाते लिंक आहे का

नाव व कागदपत्रातील माहिती अचूक आहे का

मोबाईल क्रमांक सक्रिय आहे का

बँक खाते चालू स्थितीत आहे का

अर्जातील माहिती योग्य भरलेली आहे का

महिला व बालविकास विभाग, महा-ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय किंवा संबंधित अधिकृत केंद्रावर जाऊन e-KYC दुरुस्ती करता येणार आहे.

ही संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्याने सोयगाव तालुक्यातील सर्व पात्र 'लाडक्या बहिणींनी' ३० एप्रिलपूर्वी e-KYC दुरुस्ती करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मनोहर डी. सोनवणे(सावळदबारा) यांनी केले आहे.

योजनेचा लाभ थेट महिलांच्या खात्यात जमा होत असल्याने कोणतीही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये, असेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment