महाराष्ट्र सन्मान परिषद पुरस्कार सोहळा 2026"नामदेव सरोदे यांनामहाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्यगौरव जाहीर .
नेवासा दिनांक .०९.०४.२०२६
ज्यांच्या पोटी जन्म झाला, त्या उभयतांच्या आयुष्याचं आज खऱ्या अर्थाने सार्थक झालं आहे.
“पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा” — या उक्तीप्रमाणेच आज आपण अनुभवत असलेलं सत्य आहे.
असं म्हणतात की, मानवाचे कार्य पूर्णत्वास गेल्याशिवाय चिरनिद्रेतील परमानंदाची अनुभूती मिळत नाही. याचा प्रत्यय आज आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला. आपण पाहिलेलं, वाचलेलं, ऐकलेलं अध्यात्म आज आपल्या समोर जिवंत उभं राहिलं आणि आपण निशब्द झालो.
भावना या मानवाच्या अस्तित्वाचं मूळ आहेत, आणि त्या व्यक्त करण्यासाठी शब्द हे ईश्वरदत्त वरदान आहे. तेच संस्कार आज नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात, सरोदे परिवारात प्रत्ययास आले.
समाजकारण व समाजसेवा म्हटलं की डोळ्यासमोर पांढरे कपडे घालून वावरणारे नेते येतात; पण काही व्यक्तिमत्त्वं याला अपवाद ठरतात. राहणी साधी असली तरी विचार मात्र उच्च असतात. कारण मनुष्याचा लौकिक वेशभूषेने नव्हे, तर कर्तव्यनिष्ठा आणि उदारतेने वाढतो.
अशाच साध्या राहणीमानाचे आणि उच्च विचारांचे आदरणीय, सर्वांचे लाडके भाऊ – श्री. नामदेव सरोदे.
जीवनात निरभ्र आकाशाची स्वच्छता, आनंददायी नदीची प्रसन्नता आणि सागरासारखी विशालता ज्यांनी आत्मसात केली आहे, असे हे धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. प्रत्येक कसोटी आणि आव्हान पेलत, अनुभव, विचार आणि यशाची त्रिवेणी त्यांनी सहज प्राप्त केली आहे.
शून्यातून विश्व निर्माण करत, स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहिलेलं हे अभ्यासू व संस्कारी व्यक्तिमत्त्व म्हणजे सरोदे परिवाराचा आणि त्यांच्या साहित्य रत्न डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान चा खरा आधारस्तंभ. व बंद्या रुपयासारखं खणखणीत व्यक्तिमत्त्व असणाऱ्या नामदेव भाऊंचं मनःपूर्वक कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
“माझ्यासोबत असणारी माणसंही माझ्या उंचीवर यावीत” — या ध्येयाने सतत झटणारा माणूस , माणुसकी धर्म जगताना जर ‘देवमाणूस’ पाहायचा असेल, तर तो नेवासा तालुक्यातील सरोदे घराण्यात पाहायला मिळतो.
गरुडाचे पंख कोंबड्याला लावता येतील, वाघाची कातडी कोल्ह्याला घालता येईल; पण त्यांचं साहस आणि धाडस मात्र अंगी असावं लागतं. ते साहसी रक्त असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. नामदेव सरोदे.
दहात एक चांगला, शंभरात एक सद्गुणी, हजारात एक दानी आणि दहा हजारात एक महात्मा असतो — पण काही व्यक्तिमत्त्वं यापेक्षा अनमोल असतात. तसेच हे अनमोल रत्न म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय नामदेव भाऊ.
माणसाने सोन्यासारखं असावं — कारण सोनं जिथे असतं तिथे मूल्य वाढवतं. त्याचप्रमाणे माणसान परिसासारखं व्हावं, ज्याच्या संगतीने इतरांचंही सोनं होतं. असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव भाऊ.महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्यगौरव पुरस्कार- २०२६ प्राप्त झाल्याबद्दलआदरणीय श्री. नामदेव भाऊ सरोदे यांना मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! व शुभेच्या...!!
शब्द संकलन: संदिप खांबे.पुणे

No comments:
Post a Comment