डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 135 व्या जयंतीची जय्यत तयारी,सर्व समाज बांधवांचा सहभाग



महागांव प्रतिनिधी, अक्षय डोंगरे 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 135 व्या जयंती निमित्य महागांव शहरात अभूतपूर्व उत्साहचे वातावरण निर्माण झाले असून १३५ व्या जयंती सोहळा भव्य दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी कार्यकर्त्याची जोरदार तयारी चालू आहे, शहरातील प्रमुख मार्गावर आकर्षक सजावट,रोशनाई,आणि फलक लावण्याचे काम जोमाने करण्यात येत आहेत. 14 एप्रिलला सकाळी 10:30 ला बौद्ध बांधव व समस्त ग्रामस्थ,भीम अनुयायी,बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध त्यांच्या अष्टधातू मुर्तीचे पूजन करण्यासाठी जमणार आहेत त्यानंतर पंचशील त्रिशरण ग्रहण करून, सर्व भीम अनुयायी रैलीच्या माध्यमातून बस स्थानक चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैल चित्रास माल्याअर्पण करून ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तदनंतर अनुसूचित जाती मुलींच्या शाळेकडून पटनाट्य सादर करून संविधान प्रतीचे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर सायंकाळी 5 वाजता बुद्ध विहार येथून प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक निघणार आहे 

मिरवणुकीतील समस्त बांधवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राजवळ भोजनाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम जयंती मंडळाचे आरोजक प्रा.शरदचंद्र डोंगरे सर .अध्यक्ष बंटी कावळे, कार्याध्यक्ष धम्मानंद कावळे, सचिव प्रवीण कावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे,शाम तायवाडे, सदस्य सिद्धांत डोंगरे,अभिजीत कांबळे,सुरज चोपडे, गोकुळ भद्रे,आदर्श सावले,गुड्डू सांगडे, सक्षम कावळे,दीपक तायवाडे.गोलू धोटे,हर्षवर्धन कावळे, राहुल बेहडे,ऋषी स्थूल, गोलू राजनकर, अमय पाटे . इर्शाद शेख .इत्यादी कार्यकर्ते डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंतीची तयारी करत आहेत एकूणच महागाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक ठरणार असल्याचे चित्र दिसून आहे.


No comments:

Post a Comment