सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा..
दर्पण (नेवासा) प्रतिनिधी : नवनाथ घावटे.
यमुनाबाई कु-हे बीएड महाविद्यालय, वडाळा बहिरोबा येथे ११ एप्रिल रोजी एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, लोकनृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका तसेच वाद्यवृंद सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. विशेषतः लोकनृत्य आणि नाटिकांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे व सांस्कृतिक वारशाची जपणूक करणे हा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. झिने एस जे होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, असे मत व्यक्त केले. तसेच उपस्थित प्रा घावटे बी सी यांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संसारे प्रिती व शेडगे त्रषिकेश यांनी तर आभार लांबे अश्विनी यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

No comments:
Post a Comment