स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे “Young Minds & Machines Expo – 2026” उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी:- जितेंद्र चांदगुडे
सोलापूर भारतीय जनता पार्टी अभियंता सेल व पदवीधर प्रकोष्ठ सेल, सोलापूर यांच्या वतीने स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVIT), सोलापूर येथे “Young Minds & Machines Expo – 2026” या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, नवकल्पना व तांत्रिक कौशल्य विकसित करणे हा होता. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शाश्वत भविष्य, पर्यावरण संरक्षण, स्मार्ट तंत्रज्ञान, शेतीसाठी उपयुक्त यंत्रे, स्वयंचलित प्रणाली, ऊर्जा बचत तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.
या स्पर्धेत उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे नाविन्य, उपयोगिता व सादरीकरण यावर आधारित मूल्यमापन केले.
इयत्ता पाचवी ते सातवी गटामध्ये तृतीय क्रमांक युवराज मल्लिका अर्जुन हत्तीनवरू आणि ऋतिक अनिल कमलापुरे ,बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर, द्वितीय क्रमांक सादिया सलीम मुलानी आणि केदार प्रवीण मोहोळकर ,सनराईज पब्लिक स्कूल दारफळ ,प्रथम क्रमांक आर्यन शरद जाधव, हर्षवर्धन महाविद्यालय हिप्परगा तळे यांना देण्यात आला.
आठवी ते दहावी गटांमध्ये तृतीय क्रमांक वीर विवेक जोशी, दामाणी विद्यामंदिर सोलापूर, द्वितीय क्रमांक रणवीर काशीराव ढोले आणि रणधीर काशीराव ढोले, दमानी प्रशाला सोलापूर, प्रथम क्रमांक श्रेया ज्ञानेश्वर गुंड आणि रिया रमेश मोहिते, ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल सोलापूर यांना देण्यात आला.
अकरावी व बारावी गटांमध्ये तृतीय क्रमांक तनवी तुकाराम पवार- सुप्रिया किसन पवार ,स्वामी विवेकानंद प्रशाला, द्वितीय क्रमांक अपर्णा प्रवीण बनसोडे आणि स्वरा योगेश शेटे, स्वामी विवेकानंद प्रशाला, प्रथम क्रमांक वैभव गजेंद्र निकम ,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ,वडाळा यांना देण्यात आला.
डिप्लोमा इंजीनियरिंग ग्रुप मध्ये तृतीय क्रमांक विराज विजयसिंह देशमुख SVERI'S कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर, द्वितीय क्रमांक ओंकार केदारनाथ रोंगे - प्रसाद सोमेश्वर जाधव SVERI'S कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर आणि प्रथम क्रमांक दिग्विजय श्रीकांत खाडे आणि नवाज अब्दुल मोगल, SVERI'S कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर यांना देण्यात आला.
डिग्री ग्रुप मध्ये तृतीय क्रमांक दिपाली परमेश्वर ममदापूरे -गौरी व्यंकट मेळगिरी, श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर, द्वितीय क्रमांक वैष्णवी दत्तात्रय पाटील-साक्षी अण्णा जाधव ,सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर आणि प्रथम क्रमांक वैशाली कृष्णा चिमणा आणि रोहिणी सतीश गुरव, एन के ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन इंजि. अनिकेत चनशेट्टी (जिल्हाध्यक्ष, BJP Engineers Cell, Solapur) व इंजि. सुरज रोंगे (महाराष्ट्र विभागीय सहसंयोजक, BJP पदवीधर प्रकोष्ठ सेल) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.संस्थेचे सेक्रेटरी अशोक भोसले साहेब, व्हाईस प्रेसिडेंट एच. एम. बागल साहेब, खजिनदार बी. डी. रोंगे साहेब आणि सर्व विश्वस्तांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि उत्कृष्ट नियोजनाचे विशेष कौतुक केले. कॅम्पस इनचार्ज प्रा. कीर्ती भोसले आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु एस सुतार यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री नरेंद्र काळे ,सभागृह नेता सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या हस्ते झाले आणि पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ मा. श्री. शशिकांत नाना चव्हाण मा. इंजि. श्री नेताजी खंडागळे ,मा. श्री. विकास वाघमारे आणि मा. श्री. राजेश जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
डॉ. श्रीकांत अंजुटगी यांच्या विशेष मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि उमेद निर्माण केली. कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून सर्वश्री चारुदत्त भुजंग,सागर पाथरूट, मंगेश आराध्ये, डॉ. सुहास राऊत ,अमोल कटारे , सुधीर पळसुले, अश्विन अभंग ,अपूर्व जाधव , श्री चांदणे सर ,सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे श्री जवंजाळ सर यांनी काम बघितले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली असून भविष्यातील संशोधन व नवकल्पनांसाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment