मायगावदेवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.


पत्रकार:- मोहन जाधव

चास (नळी):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायगावदेवी येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले. कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख चासनळी केंद्रप्रमुख महानुभाव,शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बाबाजी इरोळे त्याचप्रमाणे पठाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वाणी यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या कला आणि कौशल्याचा अप्रतिम आविष्कार घडवून आणला. बाल-गोपालांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते,आकर्षक नृत्य,नाटिका,समूहगीत तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे हा उद्देश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल उपस्थित मान्यवर व पालकांनी कौतुक व्यक्त केले.सूत्रसंचालन कचरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद बैरागी यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत मायगाव देवीचे सरपंच दिलीप शेलार उपसरपंच मुकुंद गाडे, नवनाथ साबळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाजगड, बाळासाहेब भवर, सुनील गाडे, दिलीप गाडे, सचिन गाडे,सतीश मोकळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद बैरागी समवेत सर्व सदस्य मुख्याध्यापक वाणी एस एम,वैद्य पी.ए.कचरे टी.आर.जाधव डी.बी, तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment