जि. प. मन्याळी शाळेत बाल आनंद मेळावा


बाळासाहेब पवार प्रतिनिधी

उमरखेड : मन्याळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 14 मार्च 2026 रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या घरून स्वादिष्ट व रुचकर पदार्थ बनवून आणले, शाळेत आपल्या दुकानांचे स्टॉल लावून व घरून बनवून आणलेल्या विविध पदार्थांची  ग्राहकांना विक्री केली. सदर बाल आनंद मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे, उपाध्यक्ष अंजली काळबांडे व सदस्य सपना दिवेकर, ज्योती काळबांडे, राजू काळबांडे, रविचंद्र वाढवे,शिवाजी राठोड, वर्षा काळबांडे, गंगाराम पिलवंड, राखी काळबांडे, सुजाता काळबांडे तसेच गावकरी व पालक आवर्जून उपस्थित होते. मुख्याध्यापक नागनाथ देवर्षे सर, शिवाजी पवार सर , सुनील देगावे सर व मीनाक्षी जाधव मॅडम यांनी बाल आनंद मेळावा यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment