लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश - आ.खरात



प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे मेहकर

घाटबोरी: मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे केवळ प्रशासकीय उपक्रम नसून सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरणारे लोकाभिमुख पाऊल आहे, असे प्रतिपादन आ. सिद्धार्थ खरात यांनी केले.

     यावेळी ते म्हणाले की, शासनाच्या योजना कागदोपत्री न राहता त्या थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. समाजातील सर्वसामान्य, शेतकरी, विद्यार्थी आणि गरजू कुटुंबांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून त्यावर तत्काळ उपाय करण्यासाठी अशा समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

      या शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित अडचणी सोडविणे, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेली विविध कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा विविध कागदपत्रांसाठी सेतू केंद्रावर सेतू चालकाकडून अतिरिक्त पैसे मागितले जात असल्यास नागरिकांनी तात्काळ फोनद्वारे किंवा लेखी तक्रार करून संबंधित बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन तहसीलदार निलेश मडके यांनी उपस्थित नागरिकांना केले.

      बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेकजण शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, तर खरे गरजवंत लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत, असे प्रतिपादन घाटबोरीचे माजी सरपंच गजानन चनेवार यानी आ. सिद्धार्थ खरात आणि तहसीलदार निलेश मडके यांच्यासमोर केले. त्यामुळे आजचे समाधान शिबिर लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असले तरी, याआधी लाभ घेतलेल्या बोगस लाभार्थ्यांचा आणि दलालांच्या साखळीचा शोध घेणे आवश्यक आहे, असे मतही माजी सरपंच गजानन चनेवार यांनी व्यक्त केले.कागदपत्रे उपलब्ध करून देणे, तसेच गोरगरीब आणि पात्र कुटुंबांना घरकुलासारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. अनेक सेवा आणि कागदपत्रे थेट शिबिरस्थळीच विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसून आले.

     'लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान, त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेची चमक आणि त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा दिलासा हाच अशा समाधान शिबिरांचा खरा उद्देश आणि खरे यश आहे,' अशा शब्दांत आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.

     यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, तहसीलदार निलेश मडके, निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर, नायब तहसीलदार विवेक नालट, भूमी अभिलेख तालुका अधिकारी किशोर गवई,लोणीगवळी मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार, पत्रकार संतोष अवसरमोल, ग्राम महसूल अधिकारी जी.ए. उंबरकर, भोसा तलाठी एम. एस. सदार, तलाठी व्ही. व्ही. काळे, तलाठी एस. डी. वाठोरे, तलाठी एस. एल. अवसरमोल, तलाठी के. एच. कोलते, वैद्यकीय अधिकारी प्रियंका गवई, वित्त विभाग अधिकारी गणेश गावंडे व विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरसम्राट जनजागृती कलासंच,आंध्रुडचे गायक  प्रा.साहेबराव अंभोरे (शिक्षक) यांनी  'महाराजस्व शिबिर आज आलया गावाला' हे स्वरचित गीत सादर केले. तर सूत्रसंचालन तलाठी महादेव सदार यांनी केले. समाधान शिबीराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, तलाठी जी. ए. उंबरकर, यांनी परिश्रम घेतले आहेत. 

प्रा.साहेबराव अंभोरे आणि संच यांचा जनजागृतीपर सुरेल गीतांचा नजराणा.

'स्वरसम्राट' जनजागृती कलासंच,आंध्रुड चे कलावंत गायक प्रा.साहेबराव अंभोरे (शिक्षक) व दत्ता पवार यांनी स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, दोनच राजे, शिवार पिकलं भारानं वाकलं, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, फुलेंनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला,महाराजस्व शिबिर आज आलया गावाला(स्वरचित गीत), असे दर्जेदार,बहारदार जनजागृतीपर गीते सादर करत कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले. ढोलक वादन सुखदेव  पवार, हार्मोनियम साहेबराव अंभोरे तर साथसंगत दगडू पवार अंभोरे ताई यांनी केला. 'वसा प्रबोधनाचा - ध्यास बंधुत्वाचा ' या संचाचे हे बोधवाक्य असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत १००० च्या वर जनजागृतीचे कार्यक्रम केलेले आहेत हे विशेष.


No comments:

Post a Comment