जागतिक महिला दिनानिमित्त श्री संत गुणवंत महाराज विदयालय पुंडलिक नगर सिरसो मूर्तिजापूर यांच्या कडून कर्तबगार महिलांचा सत्कार,

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

आज दिनांक 9/3/2026 रोजी श्री संत गुणवंत महाराज निवासी मतिमंद विद्यालय व स्वर्गीय मधुकरराव सरदार निवासी मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्य विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचे सत्कार कार्यक्रम विद्यालयात साजरा करण्यात आला व त्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रुपालीताई केतन तिडके  व सौ नूतनताई हरिषभाऊ पिंपळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ  सौ मोनालीताई कमलाकर गावंडे, प्रा डॉ राजकन्या खनखने मॅडम, श्री गजानन महाराज फिटनेस क्लब मूर्तिजापूर च्या कोच नारीशक्ती  पुरस्कार प्राप्त सौ मिराताई राजेंद्र बोंडे,सौ लिलाबाई खांडेकर संस्थेचे सचिव सौ उमाताई खांडेकर श्री आई बाबा बहूउद्देशीय संस्था सालतवाडा चे अध्यक्ष गजाननभाऊ चव्हाण उपस्थित होते, सर्व पाहुण्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब महादेवराव खांडेकर  यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले या वेळी सर्व पाहुण्यांनी  या विदयालयातील विदयार्थ्यांचे व बाळासाहेबांचे कौतुक करत , आमच्या कडुन काही मदत लागल्यास आम्ही नक्की मदत करु व आपले कार्य महान आहे असे गौरव ऊदगार काढत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, व विद्यालयास नूतनताई पिंपळे यांनी  5000रु  व सौ,मीराताई बोंडे यांच्यातर्फे 10,000रुपये  देणगी देण्यात आली, या वेळी सर्व विद्यार्थी वर्ग मुख्याध्यापक ऋषिकेश खांडेकर, रितेश खांडेकर,अबोली बनसोड,कोमल मॅडम,कमलेश नवले, इलियास शेख, इत्यादी व इतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment