जत नगरपरिषद यांच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव : सुप्रिया बामणे , काजल काळे



 प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत 

 

 जत नगरपरिषद जत यांच्या वतीने जागतिक महिलादिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला भगिनींचा , आशा वर्कर , सफाई कर्मचारी , महिला बचत गटातील उद्योजक , पोलीस दलातील महिला दक्षता पथक व शासकीय रुग्णालयातील सेविका यांचा गौरव सोहळा व समस्त महिलांना मार्गदर्शन व्याख्यान , मनोरंजन कार्यक्रम मंगळवार दि . 10/03/2025 रोजी सायं 4 वा साईप्रकाश मंगल कार्यालय येथे आयोजित केले आहे .अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक कमिटी मधील महिला व बालविकास सभापती सुप्रिया बामणे व काजल काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली ह्या कार्यक्रमासाठी उरून ईश्वरपूर येथील डॉ . एन . डी . पाटील लॉ कॉलेज च्या प्राचार्य डॉ . प्रा . अर्चना अरुण चव्हाण (थोरात ) यांचा उंच माझा झोका या विषयावर व्याख्यान होणार आहे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दै . तरुण भारत चे संपादक मा . श्री . शिवराज अप्पासाहेब काटकर व उदघाटक सौ . वर्षाताई विक्रमसिंह सावंत हे असणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ रवींद्र आरळी नगराध्यक्ष जत , मा . श्री . विक्रम दादा ताड उपनगरध्यक्ष जत , मा . श्री . लक्ष्मण राठोड मुख्याधिकारी , जत नगरपरिषद हे असणार आहेत . उपस्तित मध्ये सौ गायत्रीदेवी सुजय शिंदे , सौ .रेणुका रवींद्र आरळी , डॉ वीणा शंकर तंगडी , सौ .कोमल संतोष कांबळे ,सौ . मोहिनी शिंदे, सौ . मुस्कान गवंडी , सौ . ज्योती माने , सौ . मधुरा कुलकर्णी , सौ .लक्ष्मी कैकाडी , सौ सीमा पट्टणशेट्टी , सौ .संगीत सोनुले , सौ .उज्वला कोळी , सौ स्नेहल मोरे , सौ .प्रणिता यादव , सौ .नंदिनी मठपती ,सौ . शिल्पा भिसे , सौ . सुनेरा नदाफ , सौ . तृप्ती ऐवळे , सौ स्वाती हिरवे , सौ रुपाली साळे हे उपस्तित असणार आहेत ह्या कार्यक्रमाचे संयोजक महिला व बालविकास सभापती सौ सुप्रिया बामणे , नगरसेविका सौ काजल काळे , नीलाबाई कोळी , सौ शबाना जमखंडी सौ . अर्चना केंगार हे आहेत .

कार्यक्रमाचे खास आकर्षण झी -टिव्ही फेम सिने अभिनेते वृषभ अक्कीवाटे यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम असणार आहे. तरी जत मधील सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे 


No comments:

Post a Comment