सुदृढ समाज निर्मितीसाठी महिलांचा सन्मान अत्यावश्यक - प्राचार्य वसंतराव गाडेकर.
_पुष्पवृष्टी करून महिलांचा सन्मान करीत जि . प . हायस्कूल मंगरूळ नवघरे येथे महिला दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
मंगरूळ नवघरे : चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथिल जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ८ मार्च रोजी पुष्पवृष्टी करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या याबाबत सविस्तर असे की , जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळ नवघरे येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य विद्यार्थ्यांच्या माता पालक व गावातील महिला भगिनींचा सन्मान व्हावा या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर यांचेकडून महिला भगिनींना विशेष निमंत्रित करण्यात आले होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महिला सरपंच सौ . नलिनीताई जाधव यांचेसह उपस्थित सर्व माता पालक तथा गृहीणी भगिनींचा पुष्पवृष्टी करून आगळा वेगळा सन्मान करण्यात आला . त्यावेळी बोलतांना प्राचार्य वसंतराव गाडेकर म्हणाले की , भारतीय संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती मानले असून प्रेम , त्याग , जिव्हाळा व समर्पनाची भावना जोपासणाऱ्या कुटूंब वत्सल आई - आजी - माता - महिला भगिनींचा पदोपदी सन्मान केला पाहीजे तेव्हाच सदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते .
याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक रामनंदन केदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ . नलिनीताई जाधव व उपस्थित महिलांमधून श्रीमती सिंधुताई पैठणे व सौ सुनंदाताई धोंगडे तसेच शाळेच्या मंत्रीमंडळातील उपप्रधानमंत्री असलेली कु . संस्कृती महादेव वाकडे , कु . वैष्णवी सतिश हरणे, कु . अक्षरा विष्णू गोजरे यांनी समायोचित भाषणे करून महिलांचे महत्व पटवून दिले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश घुगे यांनी तर प्रा . दत्तात्रय वांजोळ यांनी उपस्थित महिला भगिनींचे आभार मानले . यावेळी माजी सरपंच मनोहरभाऊ शिंदे , सतिश पवार , ज्येष्ठ शिक्षक परमेश्वर सुर्वे , राजेंद्र चव्हाण , गजानन गोसावी , प्रा . रविकुमार शेळके , पंढरी रिंढे , तुषार कुसुंबे , विज्ञान शिक्षिका सुनयना नेवारे , श्रीमती कविता उंबरकर , निलाक्षी भालेराव यांचेसह गावातील महिला , विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठया संख्येने होत्या .

No comments:
Post a Comment