आखाडा बाळापूरात पोलीसांचे पथसंचलन



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी  आखाडा बाळापूर : १९ मार्च २०२६ रोजी १०:००/१२:३० वाजण्याच्या दरम्यान आगामी रमजान ईद रामनवमी सण उत्सव अनुषंगाने पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर येथे शहरात पोलीस स्टेशन पासून मिश्र वस्ती, महत्वाचे पॉईंट व मजीद परिसरामध्ये, प्रमुख रस्त्यावर रूट मार्च घेण्यात आला त्या नंतर दंगा काबू बाबत रंगीत तालीम घेण्यात आली.

सदर रूट मार्च व रंगीत तालीम करिता पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, पोलीस अमलदार शेख अनसार, संतोष नागरगोजे, पंढरीनाथ चव्हाण, राजेश घोंगडे, डीएसबीचे अतुल मस्के, अरविंद जाधव पोलीस कर्मचारी व २५ होमगार्ड हजर होते.


No comments:

Post a Comment