“जागतिक महिला दिनानिमित्त करमाळ्यात "सखी मेळावा" महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन” - महिला व बालकल्याण सभापती श्रीमती निर्मलाताई गायकवाड



जागतिक महिला दिनानिमित्त करमाळा नगरपरिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी "सखी मेळावा" अंतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती करमाळा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती निर्मलाताई गायकवाड यांनी दिली.

महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. करमाळा शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि या उपक्रमाचा आनंद द्विगणित करावा असे, आव्हान सभापती श्रीमती गायकवाड यांनी केले आहे.

या कार्यक्रमांतर्गत दिनांक ९ मार्च 2026 रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत विकी मंगल कार्यालय करमाळा येथे संगीत खुर्ची व बकेटमध्ये बॉल टाकणे यासारखे विविध प्रकारचे मनोरंजक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि १० मार्च 2026 रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत त्याच ठिकाणी पाककृती स्पर्धा व उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

दि. 11 मार्च रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत विकी मंगल कार्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रम व  बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमात महिलांकडून विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार असून स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

प्रत्येक स्पर्धेतून प्रथम तीन विजेते निवडण्यात येणार असून त्यांना ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे प्रदान केली जातील तसेच सांस्कृतिक कार्यक्रमास सहभागी घेणाऱ्या महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू असून इच्छुक महिलांनी तुषार टमसाळे (मो9960236571), अश्विनी जाधव (मो.7972847209), शितल बहाड (मो.9172423351), आणि सुप्रिया पालखे (मो.7972650508), यांच्याशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी असे आव्हान महिला व बालकल्याण सभापती श्रीमती निर्मलाताई गायकवाड यांनी केले आहे.


 

No comments:

Post a Comment