यमुनाबाई कुऱ्हे बीएड महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
दर्पण न्यूज (नेवासा) प्रतिनिधी - नवनाथ घावटे.
दि. 8 मार्च रोजी यमुनाबाई कुऱ्हे बीएड महाविद्यालयात (वडाळा बहिरोबा ता.नेवासा) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.वैशाली मरकड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
या कार्यक्रमात महिला सशक्तिकरण, शिक्षणातील महिलांची भूमिका आणि समाजातील महिलांचे योगदान याविषयी मार्गदर्शनपर भाषणे झाली. तसेच यावेळी यमुनाबाई कुऱ्हे विद्यालयातील विद्यार्थिनींनी भाषण, कविता, गीते आणि विविध कार्यक्रम सादर केले.तसेच महिला दिना निमित्त विद्यालयाच्या वतीने महिला साठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.वैशाली मरकड यांनी महिलांना आहाराविषयी व आरोग्या संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयात महिलांचे विविध पारंपरिक खेळ घेण्यात आले.तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय गोरक्षनाथ कुऱ्हे, प्रा. मंडलीक सर, प्रा.शिंदे सर, प्रा.घावटे सर व वडाळा बहीरोबा येथील महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन यमुनाबाई कुऱ्हे बीएड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या केले.

No comments:
Post a Comment