राम नवमी निमित्त दर्यापूर येथे भव्य मिरवणूक चे संयोजन



दर्यापूर प्रतिनिधी-दिपक मेश्राम 

दर्यापूर येथे राम नवमी निमित्त २६ मार्च २०२६ रोजी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे एक भव्य आणि लक्षवेधक शोभायात्रा काढण्यात आली सायंकाळी ५ वाजता  पासून गौरक्षण मैदानातून निघणाऱ्या या मिरवणुकीत ढोल-ताशे, राम-हनुमान चित्ररथ आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण आकर्षण आले , ज्यासाठी १५ दिवसांपासून तयारी सुरू असते । 

दर्यापूर राम नवमी मिरवणुकीची प्रमुख वैशिष्ट्ये:

आयोजक: बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद।

सुरुवात: गुरुवार, २६ मार्च, सायं ५:०० वाजता, गौरक्षण मैदान।

आकर्षण: ढोल-ताशे, महाकाल पथक, प्रभू श्रीराम, हनुमान आणि काली मातेचे चित्ररथ, मर्दानी खेळांचे प्रदर्शन।

आवाहन: सर्व रामभक्तांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे।

No comments:

Post a Comment