पेट्रोलपंपधारकांनी बाटल्यात व कॅन मध्ये पेट्रोल देऊ नये.
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी२६ मार्च हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेसा असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पेट्रोलपंप धारकांनी कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. सध्या पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी शहरातील पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवत नागरिक वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तसेच पेट्रोलपंप धारकांना निर्देश दिले असून नागरिकांनी पॅनीक होऊ नये. तसेच दुचाकी वाहनासाठी जास्तीत जास्त २०० रूपये पर्यंतच इंधन भरण्यात यावे. तीनचाकी व चारचाकी वाहनासाठी जास्तीत जास्त २ हजार रूपये पर्यंतच इंधन भरण्यात यावे. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या अथवा ड्रम आदींमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे. रूग्णवाहीका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. सर्व पेट्रोलपंप धारकांनी सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कारवाईचा इशारा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment