हांडेवाडी येथील म्हसोबा यात्रोत्सव उत्साहात संपन्न.
पत्रकार:- मोहन जाधव.
चास नळी:- हांडेवाडी येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचा वार्षिक यात्रोत्सव यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. यात्रेनिमित्त गावात धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या दिवशी भाविकांनी सकाळी म्हसोबा महाराजांची पारंपरिक पूजा-अर्चा, अभिषेक व आरती करण्यात केली. दुपारी ५ वाजेच्या सुमारास गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संपूर्ण यात्रोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच यात्रा कमिटीने मोलाचे सहकार्य केले.

No comments:
Post a Comment