शिवसेना उपनगराध्यक्ष,माजी नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याला यश
. (महागाव शहरातील दलीत वस्ती सह विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर)
महागाव:- प्रतिनिधी अक्षय डोंगरे
शहरातील दलित वस्तीसह जलशुद्धीकरण केंद्रांची संरक्षक भिंत,समाज कल्याण शाळेचा रस्ता यांसह विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी राज्यशासनाच्या वतीने मंजुर करण्यात आला असुन याकरिता विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,माजी नगराध्यक्षा सौ. करूणा नारायण शिबिरे व नगरसेवक सुजितसिंह ठाकुर यांनी केलेल्या पाठ पुराव्याला यश आल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
महागाव न. प. मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास कामाचा सपाटा सुरू असुन शहरातील दलित वस्ती, समाज कल्याण शाळेकडे जाणारा रस्ता ,घनकचरा व्यवस्थापन ,जलशुद्धीकरण केंद्राला संरक्षक भिंत यांसह विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता शिवसेना (उबाठा)चे उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,माजी नगराध्यक्षा सौ. करूणा नारायण शिरबिरे व स्वीकृत नगरसेवक सुजितसिंह ठाकुर यांनी मागील तीन वर्षांपासून निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे पाठपुरावा केला परंतु याठिकाणी असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे त्याला अनेक अडचणी येत होत्या.
परंतु नुकताच याठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाला असुन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होण्यासाठी मदत करणाऱ्या उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,माजी नगराध्यक्षा सौ. करुणा शिरबिरे व नगरसेवक सुजितसिंह ठाकुर यांच्या मागणीची दखल घेवुन आमदार किसनराव वानखेडे व भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी याबाबत शासनाकडे निधी मंजुर करण्याची मागणी केली. त्यानुसार महागाव शहरात अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती योजनेअंतर्गत २कोटी७०लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन त्यामध्ये प्रभाग क्रमांक १०मध्ये१कोटी ४९लाख, प्रभाग क्रमांक ६ मध्ये९१लाख,प्रभाग क्रमांक १७ मध्ये ३०लाख रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत.त्याच प्रमाणे शहरातील विविध विकास कामांसाठी ७कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी १कोटी२६लक्ष रुपये यांसह प्रभाग क्रमांक १०मधील जलशुद्धीकरण केंद्राची संरक्षण भिंत ४०लक्ष,फुलसावंगी रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरून समाज कल्याण शाळा व त्याच परिसरात असलेल्या विविध शाळांकडे जाणारा रस्ता निर्माण करण्यात येणार आहे.
उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,माजी नगराध्यक्षा सौ.करूणा नारायण शिरबिरे व नगरसेवक सुजितसिंह ठाकुर यांनी केल्या पाठपुराव्यामुळेच महागाव न. पं. एकाच वेळी एवढा मोठा निधी मंजुर झाल्याने शहर वासियांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.


No comments:
Post a Comment