यमुनाबाई कु-हे बी. एड. महाविद्यालयातील शैक्षणिक प्रदर्शन उत्साहात संपन्न.



दर्पण न्यूज (नेवासा) प्रतिनिधी:नवनाथ घावटे.

वडाळा बहिरोबा तालुका नेवासा येथील यमुना बाई कुऱ्हे बीएड महाविद्यालयामध्ये शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रदर्शनाचा उद्देश बी. एड. कोर्स कोड 206 A अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कौशल्ये आणि शैक्षणिक ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा होता.

या कार्यक्रमात विविध विषयांवर आधारित प्रकल्प, मॉडेल्स, पोस्टर्स आणि चार्ट्स सादर करण्यात आले. विशेषतः भारतीय ज्ञान परंपरा (IKS), पर्यावरण संरक्षण, तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर, तसेच स्थानिक वारसा यांसारख्या विषयांना विशेष महत्त्व देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि संशोधनात्मक दृष्टीकोनातून विविध उपक्रम सादर केले.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कोमल कु-हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञान वाढते, असे मत व्यक्त केले.

तसेच या प्रदर्शनास अध्यक्ष म्हणून प्रा मंडलिक पी. डी. उपस्थित होते प्रा शिंदे बी. बी. प्रा घावटे बी. सी. यांनी विद्यार्थी शिक्षकांच्या सादरीकरणाचे कौतुक केले .  कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून झाले.

अशा शैक्षणिक प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोरपडे सुनिता यांनी तर आभार प्रदर्शन धोंडे सुप्रिया यांनी केले .


No comments:

Post a Comment